Advertisement

बीडमध्ये 'स्पा'चा बाजार उठला

प्रजापत्र | Wednesday, 30/09/2026
बातमी शेअर करा

बीड-स्पाच्या नावाखाली अश्लीलतेचा बाजार भरविणाऱ्या तीन ठिकाणी बीड पोलिसांना एकाच वेळी छापे टाकत काही पीडिता आणि आरोपीना ताब्यात घेतले आहे. बीड शहर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतं आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत आणि अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया झाल्याची माहिती आहे.

   बीडमध्ये मागच्या काही दिवसापासून स्पा च्या नावाखाली अश्लील प्रकार मोठया प्रमाणावर सुरु झाले होते. शहरात जवळपास १० ठिकाणी कोणतीही परवानगी नसताना अवैधपणे भरणाऱ्या या धंद्यावर पोलिसांनी एकाच वेळी छापेमारी करत अनेकांना धक्का दिला आहे. ब्लीस, मेडो आणि क्रिस्टल स्पावर पोलिसांनी रेड मारून मोठी कारवाई केली आहे. यावेळी पाच पीडितांची सुटका पोलिसांनी केल्याची प्राथमिक माहिती असून सहा-सात जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कळते. बीडमध्ये पहिल्यांदाच स्पाचा बाजार पोलिसांनी एकाच वेळी उठवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

Advertisement

Advertisement