Advertisement

दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

प्रजापत्र | Tuesday, 29/09/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२८(प्रतिनिधी): शहरातील पालवण चौकात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या पथकाने सोमवार (दि.२८) रोजी रात्री कारवाई करत ९६ देशी दारूच्या बाटल्या,इलेक्ट्रिक स्कूटर असा एकूण १,५१,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

      उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाकडून शहर व परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध कारवायांचा सपाटा सुरू केला असून बीड शहरातील पालवण चौक येथे दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली असून या कारवाईत ११,५२० किमतीच्या ९६ देशी दारूच्या बाटल्या तसेच १,४०,००० किमतीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आली.याप्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री.सय्यद,पोलीस हवालदार अशोक दराडे, राहुल शिंदे, अविनाश सानप, संतोष रणदिवे, कुलदीप औसरमल,शशिकांत ढाकणे व विशाल जगताप यांनी केली.

Advertisement

Advertisement