नेकनूर दि.२२(वार्ताहार):मांजरसुंबा येथे शुक्रवार (दि.१८) रोजी तांदूळ भरलेला ट्रक पलटी झाला होता. हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असावा आणि काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा संशय नागरिकांना आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. रात्री उशिरा तांदळासह ट्रक ताब्यात घेत नेकनूर पोलीस ठाण्यात लावला.विशेषतःतांदूळ स्वस्त धान्य दुकानावरील आहे की अंगणवाडीतील सकस आहार की अन्य कुठला याबाबत आणखीनही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाटोद्याकडून मांजरसुंबाच्या दिशेने निघालेला ट्रक क्रमांक. ०९.६८५५ च्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे वळणावर शुक्रवार (दि.१८)रोजी रात्री अकराच्या सुमारास पलटी झाला.ट्रक पलटी झाल्याने बाजूलाच असलेल्या खंडाळा,जाधव वस्ती येथील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. असता सदर ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या आढळून आल्या. सदरील तांदूळ स्वस्त धान्य दुकानावरील असावा म्हणून काही नागरिकांनी नेकनूर पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेनंतर काही वेळानेच दोन अनोळखी वाहने आली.त्यांनी चालकांना गाडीत बसवून पोलीस ठाण्याकडे नेले असल्याचे सांगण्यात आले,त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास पुन्हा दुसरी एमएच ४४ यु १९०३ या क्रमांकाची ट्रक आली.त्यामध्ये हा तांदूळ हलवण्यात आला होता अशी माहिती आहे,अपघातग्रस्त ट्रकसह तांदूळ पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.शुक्रवार पासून तांदळासह ट्रक नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये असून त्यातील तांदूळ रेषणचा आहे की अंगणवाडीचा सकस आहार की अन्य कुठला? या संदर्भात आणखीनही चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करा
