शिरूर कासार दि.१५(प्रतिनिधी ):तालुक्यातील खोकरमोह येथे टेम्पोच्या सहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळतात सोमवार (दि.) रोजी रात्री कारवाई करत २० लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह येथील आघाव वस्ती परिसरात वाळूची वाहतूक करताना सलमान बेग रईस बेग (वय २६) रा.खासबाग ता.जि.बीड यांच्यावर सोमवार (दि.१४) रोजी रात्री १० च्या सुमारास कारवाई करत टाटा कंपनीचा विना नंबरचा टेम्पो त्यात २ ब्रास वाळू असा एकूण २० लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोअ दादासाहेब उबाळे यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध शिरूर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई सपोनि राजेश गडवे यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब उबाळे,श्री.तांदळे यांनी केली.

