Advertisement

पाटोद्यात चिमुकलीच्या न्यायासाठी मोर्चा 

प्रजापत्र | Friday, 11/09/2026
बातमी शेअर करा

पाटोदा : तालुक्यातील एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी आज शुक्रवारी (दि.११) उपविभागीय कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पाटोदा तालुक्यातील एका
गावातील अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला असून, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या वाढत्या घटना पाहता शासनाने अशा प्रकरणात कठोर भूमिका घेत आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि पीडितेला व कुटुंबाला न्याय मिळावा या उद्देशाने सर्वसमावेशक असा न्याय मिळालाच पाहिजे म्हणत पाटोदा उपविभागीय कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढून न्यायाची
मागणी केली.यावेळी अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच महिला,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement