Advertisement

पोलीस निरीक्षक विनोद घोळवे नियंत्रण कक्षात

प्रजापत्र | Tuesday, 08/09/2026
बातमी शेअर करा

बीड-अंबाजोगाई, पाटोदा पोलीस ठाण्याची जबाबदारी पार पडल्यानंतर बीडच्या शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांची बदली करण्यात आली आहे. ते आता नियंत्रण कक्षात आले असून तात्पुरता पदभार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सपोनि दीपक लंके यांची शहर पोलीस ठाण्यात बदली करत त्यांच्याकडे शहर पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हे आदेश काढले असून आता शहर ठाण्याला कोणात्या अधिकाऱ्यांची नियुक्ती लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे या दोन अधिकाऱ्यांची नावे मोठया प्रमाणावर सध्या चर्चेत आहेत.

Advertisement

Advertisement