वडवणी दि.२१-शहरात सायंकाळच्या सुमारास दोन गटात वाद होऊन दगडफेकीची घटना घडल्याने जातीय तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र वडवणीत आहे.दोन समाजात वाद होऊन या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याचे सांगितले जात आहे.यात काही लोक जखमी झाल्याचा देखील दावा करण्यात येत असून सध्या वडवणी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी जमली असल्याने पोलिसांचा देखील तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
वडवणीतील बाजारपेठेत रस्त्याच्या कारणावरून वाद झाले.यावेळी एका कारने काही व्यापाऱ्यांच्या गाड्या उडवल्यामुळे तणाव निर्माण झाला.काही काळानंतर लोक जमल्यामुळे दगडफेक सुरु झाली,या घटनेत काही जणांना मार देखील लागल्यानंतर शहारत याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.बघताबघता लोकांची गर्दी वाढल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.या प्रकारामुळे वडवणीत सध्या तणावपूर्ण शांतात असली तर पोलीस ठाण्यात लोक मोठ्याप्रमाणावर जमले आहेत.वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आले असून सध्या पोलिसांकडून तपास सुरु असलयाचे कळते.

बातमी शेअर करा
