Advertisement

उपोषणस्थळीच विलास घुलेंच्या पत्नीने केले विष प्राशन

प्रजापत्र | Friday, 14/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि. १४ (प्रतिनिधी): केज तालुक्यातील विलास घुले या तरुणाच्या हत्येप्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या १० दिवसांपासून विलास घुले यांच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरू आहे. मात्र, १० दिवस उलटूनही प्रशासनाकडून या मागणीची योग्य दखल न घेतल्याने, आज अखेर उपोषणस्थळी बंदोबस्तासाठी हजर असलेल्या पोलिसांसमोरच स्वर्गीय रमेश घुले यांच्या पत्नीने विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना घडली. 
या घटनेनंतर उपोषणस्थळी मोठी पळापळ उडाली असून, पीडित महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांदेखत घडलेल्या या प्रकारामुळे घुले हत्या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले असून, या संवेदनशील घटनेनंतर पोलीस व जिल्हा प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement