Advertisement

डॉमिनोज,केएफसीसह बड्या ब्रँड्सवर अन्न,औषध प्रशासनाची धाड

प्रजापत्र | Thursday, 13/08/2026
बातमी शेअर करा

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात धडक कारवाया सुरु केल्या जात आहेत. या कारवायांमुळे अन्न माफियांवर आळा बसला आहे. नुकतेच एफडीएने १० मिनिटांत डिलिव्हरी पोहोचवणाऱ्या ब्लिंकइटच्या मुंबई येथील गोदामावर धाड टाकली. या कारवाईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना निलंबित करण्यात आला होता. एफडीएची ही कारवाई चर्चेत असताना आता पुन्हा डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाने डोमिनोज पिझ्झा, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉन्जिनीज (Monginis) यांसारख्या ब्रँड्सच्या एकूण १०४ आस्थापनांची तपासणी केली होती. या तपासणीत स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे एफडीएने डोमिनोज पिझ्झाच्या चार शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ९५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.एफडीए प्रशासनाने ब्लिंकइटनंतर बोरीवली (प.) येथील डोमिनोज पिझ्झाच्या एका शाखेमध्ये छापा टाकला. ज्यामध्ये अन्न साठवणूक, तापमान, अन्नाची तपासणी, स्वच्छता अशा अनेक त्रुटी समोर आल्या. तसेच घाटकोपर पश्चिम येथील एका मॉलमधील ‘डोमिनोज’च्या एका शाखेसह सातारा जिल्ह्यातील डोमिनोजच्या एका शाखेचा परवाना नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे निलंबित करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement