Advertisement

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यु 

प्रजापत्र | Thursday, 13/08/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.१३(प्रतिनिधी):अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजता विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर काजळा-तांदळा गावा जवळ घडली असून,या अपघात एक जण गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेवराई शहरात पाच भाविक रिक्षाने बुधवार (दि.१२) रोजी मढी ता. पाथर्डी येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून माघारी येत असताना रात्री साडे  अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची रिक्षा काजळा-तांदळा ता.गेवराई गावाजवळ नैसर्गिक विधीसाठी थांबल्यानंतर, दोघेजण रिक्षाकडे येत असतानाच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दोघांनाही जोराची धडक दिल्याने, या अपघातात सचिन दिलीप गोचिडे (वय ३८) रा. गेवराई यांचा मृत्यु झाला तर ओम निकम (वय ३५) हा गंभीर जखमी झाला असून,त्याच्यावर संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

Advertisement