बीड दि.३१(प्रतिनिधी):दिंडीत घुसून महिला वारकऱ्यांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून १ लाख १९ हजार ९९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड ग्रामीण हद्दीत श्री क्षेत्र नारायणगड येथील दिंडी दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका महिला वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे केशरबाई सुखदेव जाधव,संगिता विजय गायकवाड (दोघी रा. गांधी नगर, पेठ बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघींनीही गुन्ह्याची कबुली दिली असुन पोलीसांनी त्यांच्याकडून १ तोळे २.५ ग्रॅम सोने असा एकूण १ लाख १९ हजार ९९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नबनीत काँवत, अप्पर अधिक्षक समीर शेख, पोलीस उपअधिक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.शिवाजी बंटेवाड, पोउपनि शेखर औटे, पोह.अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, स्वाती मुंडे, मनोज परजणे,सिध्देश्वर मांजरे यांनी केली.

बातमी शेअर करा
