अंबड : तालुक्यातील शहापूर येथे गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवार (दि.४) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
जालना येथुन बीडच्या दिशेने जाणारी अंबड आगाराची बस क्रमांक (एम एच १४ बी टी ३०२२) व भांबेरी येथुन अंबड येथे शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणारी अंबड आगाराची बस क्रमांक (एम एच १४ एम एच १७५०) या दोन बसेसची शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावर समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही बसचे चालक व वाहक जखमी आहेत. सुदैवाने या अपघातात जिवितहनी टळली आहे.
बातमी शेअर करा

