केज दि.४(प्रतिनिधी): तालुक्यातील तांबवा येथे महामार्गालगत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २६ वर्षीय तरुणाला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वैभव इंद्रमोहन कराड (वय. २६),रा. तांबवा असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी सुमारे ६ वाजता ते केज-धारूर महामार्गा लगत त्यांच्या शेताजवळील रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने (मद्यधुंद अवस्थेतील चालक असल्याची माहिती) त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत वैभव कराड यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिकअपसह चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
बातमी शेअर करा

