Advertisement

अवघ्या एका तासात मोबाईलसह चोरटा पकडला  

प्रजापत्र | Monday, 29/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२९(प्रतिनिधी): शहरातील सुभाष रोड परिसरातील मोबाईल गॅलरीमधून ६० हजार रुपये किमतीचा सॅमसंग S23 मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा बीड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात शोध लावून मोबाईल जप्त केला. 

     शाहीद आमीर शेख (वय  ३३), रा. काझी नगर, बीड यांचे सुभाष रोड येथे  मोबाईल गॅलरीचे या नावाचे दुकान असून तेथे नवीन व जुन्या मोबाईलची खरेदी-विक्री केली जाते.शनिवार (दि.२७) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका युवकाने सॅमसंग S२३ हा मोबाईल घेऊन पसार झाला.दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निसटला.चोरीला गेलेला मोबाईल हा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.मोबाईल चोरीची तक्रार दाखल होताच बीड शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत,सिसटीव्ही माध्यमातून अवघ्या एका तासात अल्पवयीन आरोपीचा शोध घेत त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त केला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख,पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.शहनशहा सय्यद ,पो.बावणकर, पो. अ.इलीयास शेख ,राम पवार यांनी केली.
 

Advertisement

Advertisement