बीड दि.२५ (प्रतिनिधी): जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, अनेक प्रकरणांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकांकडून कारवाया होत असल्याचे चित्र आहे. अशातच गुरुवार (दि.२५) रोजी जालना एसीबीच्या पथकाने बीड शहरातील शहर पोलीस ठाण्यात सापळा रचून एका पोलीस अंमलदारास आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
फिर्यादीच्या कामाशी संबंधित असलेल्या भारतीय चलनक्षम लिखत अधिनियम (एन.आय. ॲक्ट) कलम १३८ अंतर्गत नोटीस तामिल करण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने आठ हजारांची मागणी केली होती. याबाबत फिर्यादीने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी शहर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. यावेळी पोलीस अमलदार सुशेन प्रकाश उगले याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी शेअर करा
