Advertisement

 टाकरवण शाळेतील वर्ग सुरु करण्यासाठी आंदोलन 

प्रजापत्र | Thursday, 25/06/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.२५(प्रतिनिधी): माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे ५ वी तर राजेगाव येथे ८ वी चा वर्ग पुन्हा सुरू करुन यूडायस पोर्टलवर जोडून मिळावं या मागणीसाठी दोन्ही गावातील शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आजपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
   याबाबत टाकरवण व राजेगाव ता. माजलगाव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हापरिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकरवण येथे पूर्वीपासून १ ते ७ पर्यंत वर्ग होते. मात्र यानंतर तीन वर्ग बंद पडले आहेत. सध्या केवळ इयत्ता ४ थी पर्यंत शाळा सुरू आहे. येथे ५ वीचा वर्ग सुरू करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. तसेच राजेगाव येथे पूर्वीपासून इयत्ता ८ वी चा वर्ग सुरू आहे. मात्र येथून विद्यार्थ्यांनी टीसी काढून नेल्याने मागील वर्षी हा वर्ग बंद झाला होता. यामुळे हा वर्ग पुन्हा पुनर्जिवीत करुन हा वर्ग सरल व युडाएस पोर्टलवर टॅब जोडून द्यावा या मागणीसाठी दोन्ही गावाच्या शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी जिल्हापरिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

 

Advertisement

Advertisement