Advertisement

धुळे-सोलापूर रोडवर दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या 

प्रजापत्र | Tuesday, 23/06/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.२३(प्रतिनिधी):धुळे-सोलापूर रोडवर दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवार (दि.२२) रोजी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन दुचाकी व २३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
   छत्रपती संभाजी महाराज चौक समनापूर शिवारात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार (दि.१६) रोजी रात्री ०२:३० वाजता राधेशाम नंदलाल पारीख (वय ४२) रा.विप्रनगर पेठ बीड, हे पालीवरून बीडकडे दुचाकीवर जात असताना चार अनोळखी ईसमांनी त्यांना अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातून २३,००० रुपये काढून घेतले असता त्यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना गुन्ह्यातील आरोपी आवेजखान परवेजखान हा हिना पेट्रोल पंपाच्या पाठीमागे त्याच्या साथीदारांसह बार्शीनाका येथे असल्याची माहिती मिळताच आवेजखान परवेजखान (वय २५) रा.हिना पेट्रोल, अनिकेत ऊर्फ चिक्या विश्वास डोंगरे (वय २३)रा. प्रकाश अंबेडकर नगर बार्शीनाका बीड,अविनाश शैलेंद्र ससाणे (वय २२)रा. पंचशीलनगर बीड व विवेकानंद दिलीप गलांडे (वय २६)रा.पंचशीलनगर बीड यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यातील चारलेली रोख रक्कम २३००० दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. वरील सर्व आरोपी यांना मुद्देमालासह पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे हजर करण्यात आले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह.अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड,बाळु सानप,अर्जुन यादव,राहुल शिंदे,अशफाक सय्यद, मनोज परजणे ,अश्वीन सुरवसे,नितीन वडमारे यांनी कली आहे.

 

Advertisement

Advertisement