बीड दि. १९(प्रतिनिधी)- राज्याच्या गृह विभागाने ४८८ पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती दिली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश काढण्यात आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील ८ पीएसआयचा समावेश असून त्यांना जिल्ह्याबाहेर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने पोलीस दलातील सुमारे ४८८ पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश आखेर जारी केले आहेत. या अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक संवर्गात पदस्थापना देण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात प्रदीप टूबे, संदीप जाधव,प्रदीप गाडे यांना छत्रपती संभाजीनगर , निशिगंधा खुळे पुणे, रवींद्र पवार नाशिक परिक्षेत्र, प्रदीप साळुंके मुंबई शहर,अनंत तांगडे मीरा भाईंदर, शालिनी गजभारे ठाणे अशा नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात मात्र कोणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा
