मुंबई: राज्यातील कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी व्यवसायाविरोधात राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. राज्य सायबर विभागाने गुगल आणि अॅपलला नोटीस बजावली आहे. या कंपन्यांच्या अॅप स्टोअरवरून ओला, उबर आणि रॅपिडो ही अॅप्स तात्काळ हटवण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी १५ मे रोजी ही नोटीस जारी केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ७९(३) (ब) चा संधर्भ देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १२ मे रोजी सायबर विभागाला पत्र लिहून बेकायदेशीर बाईक टॅक्सी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सायबर विभागाने वेगाने हालचाली करत ही नोटीस पाठवली. या नोटीसचे पालन न केल्यास संबंधीत कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची ताकीदही देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा

