Advertisement

  बीडच्या तापमानाचा पारा ४३.अंशावर

प्रजापत्र | Tuesday, 12/05/2026
बातमी शेअर करा

बीड  दि.१२ (प्रतिनिधी): दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होत आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा वाढला असून बीडमध्ये तापमानाचा पारा ४३. अंशावर गेला आहे.  
  मुंबईतील राम मंदिर परिसरात तापमान ३९.७अंश सेल्सिअस तापमान नोंदवले आहे. सोबतच, विक्रोळीतही तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअस झाला आहे. तर वांद्रे परिसरात तापमान ३७.३ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आले आहे. तर मुंबईतील सांताक्रुज परिसरात ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर बीडमध्ये तापमानाचा पारा ४३. अंशावर गेला आहे. दरम्यान, वाढत्या उन्हाचा मोठ्या प्रमाणात त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement