बीड दि.७(प्रतिनिधी): तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीघांचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवार (दि.७)रोजी घडली आहे. तर एकाचा हृदयविकाराने मृत्यु झाला आहे. एकूणच तालुक्यात वेगवेगळ्या घटनांत चौघांचा मृत्यु झाला आहे.
बीडकडून शेतात जात असतांना पिंपळनेर रोडवर झालेल्या मोटारसायकल अपघातात अंगद जगन्नाथ पटाईत (वय ३०) रा.बीड यांचा मृत्यु झाला. गेवराई तालुक्यातील मादळमोही परिसरात दुसरा अपघात झाला. ट्रॅक्टरचे हेड अचानक वर झाल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन यामध्ये गोविंद शिंदे (वय ४०) रा. तिंतरवणी ता. शिरूरकासार यांचा मृत्यु झाला. तिसरा अपघात बीड-राजुरी रोडवर झाला असून यामध्ये योगेश नारायण भोसले (वय ३५) रा. नायगाव ता. पाटोदा यांचा मृत्यु झाला. या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यु झाला असून चौथी दुर्देवी घटना शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथे घडली असुन शिवाजी गित्ते रा. खोकरमोहा
यांना आज पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. गित्ते यांच्या अचानक जाण्याने नातेवाईकांसह मित्र परिवारा मोठा धक्का बसला आहे.

