Advertisement

तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात 

प्रजापत्र | Thursday, 07/05/2026
बातमी शेअर करा

बीड-येथील तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात लातूरमधून अटक केल्याची माहिती समोर येतं आहे.लातूरच्या न्यायालयात आज त्यांना हजर करून बीडला आणण्यात येणार असल्याचे कळते.
   बीड जिल्ह्यात भूसंपादनच्या कथित घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर यात अविनाश पाठक यांचा देखील समावेश होता.याप्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक पूजा पवार करीत होत्या. त्या सध्या रजेवर असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास एम.व्यंकटराम यांच्याकडे आला होता. अखेर लातूरमधून अविनाश पाठक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज आरोपीला लातूरच्या न्यायालयात हजर करून बीडला घेऊन येणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement