बीड-संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते.यात अखेर स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत.ही निवडणूक भावनिक आधारावर नेण्याचा संपूर्ण प्रचार धनंजय देशममुख यांच्याकडून झाला होता,मात्र मस्साजोगकरांनी धनंजय देशमुख यांच्या वाहिनी तथा मयत संतोष देशमुख देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांना निवडणून दिले आहे.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या या पदासाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा संतोष देशमुख यांच्या कुटुंबच प्रयत्न होता. मात्र त्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली होती. स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मते मागितली होती. यात अखेर गावकर्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला . तब्बल ९२ मतांनी स्वरूपानंद देशममुख विजयी झाले आहेत.
मागच्यावेळी ९ मतांनी पराभव,आता विजय
स्वरूपानंद देशमुख यांनी मागच्या वेळी देखील निवडणूक लढविली होती. त्यावेळी संतोष देशममुख यांनी त्यांचा ९ मतांनी पराभव केला होता. आता मयत संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या विरोधात तेच स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी निवडून आले आहेत.

