Advertisement

घोसापूरी शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

प्रजापत्र | Friday, 24/04/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२४(प्रतिनिधी): तालुक्यातील घोसापुरी शिवारामध्ये कैलासगडाच्या पायथ्याशी असलेल्या खदानीतील पाण्यात एका ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात पुरुषाचा मृतदेह शुक्रवार (दि.२४) रोजी सकाळी आढळून आला.घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
      संबंधित मृतदेहाच्या उजव्या हातात काळ्या रंगाची मण्यांची माळ असून अंगावर निळसर रंगाचे अंडरवेअर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन बीड ग्रामीण पोलिसांनी केले आहे. दरम्यान, ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement