Advertisement

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 23/04/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी): तालुक्यातील ढेकनमोहा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बळीराम देवकते असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
   मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम जनार्दन देवकते (वय ४५) यांनी गुरुवार (दि.2३) रोजी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाच्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Advertisement

Advertisement