Advertisement

दारू विक्रीला देवाचा आधार

प्रजापत्र | Wednesday, 10/02/2021
बातमी शेअर करा

 

पुणे दि.१० - पिंपरी चिंचवड शहरात नुकतीच एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड मधील तीन युवकांनी अवैधरित्या दारु विकण्यासाठी चक्क देवाचा आधार घेतला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील आय.टी. पार्क असलेल्या हिंजवडी परिसरात नेऱ्हे दत्तवाडी येथे अवैधरित्या दारु विकण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. यानुसार पोलिसांनी संशयितांच्या घरावर छापा मारला आणि कारवाई केली आहे.

तपासादरम्यान संशयितांच्या घरात काहीच हाती न लागल्यामुळं पोलीस रिकाम्या हातानं परत जात असताना एका कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनं देवाच्या देव्हाऱ्याखाली हे तळघर शोधलं आणि त्या तळघरातून एक दोन नाही तर चक्क दोन हजारहून अधिक लिटर गावठी दारुचे बॅलर काढले.

दरम्यान, अवैधरित्या दारु विक्री करणारे आरोपी पुरुष नसून चक्क तीन महिला आहेत. या महिला आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement