Advertisement

नवगण राजुरीत गुटख्याच्या साठ्यावर कारवाई 

प्रजापत्र | Sunday, 19/04/2026
बातमी शेअर करा

बीड दि.१९(प्रतिनिधी):तालुक्यातील नवगण राजुरी येथील तांबोळी गल्लीत विविध कंपनीचा गुटखा साठून ठेवल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच शनिवार (दि.१८) रोजी कारवाई करत २,१९,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
    बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि नवगण राजुरी येथील तांबोळी गल्लीत रज्जाक गनीभाई तांबोळी याने विविध कंपनीचा गुटखा विक्री करण्यासाठी साठून ठेवल्याची माहिती मिळाली सदरील ठिकाणी शनिवार (दि.१८) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कारवाई केली असता तंबाखू,पानमसाला,विमल,हिरा असा विविध कंपनीचा गुटखा चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवल्याचे निदर्शनात आले असून २,१९,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सदरील आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.अधिक तपास पोलीस करत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.सोमनाथ जाधव,सपोनि.बाळराजे दराडे,पोउपनि संजय कुकलारे,पोह मनोज जोगदंड,फिरोज पठाण,सोमनाथ जायभाये,सचिन कापसे यांनी केली 

 

Advertisement

Advertisement