पुणे दि.२७(प्रतिनिधी): राज्यात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे. पुणे शहरातील लोहगाव येथे काल ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्या अनेक भागांत दमट वातावरण असून उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पुढील काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
पुढील २ दिवसांत सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, संभाजीनगर, धाराशिव, नागपूर , अमरावती या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागात पुढील २ दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० तारखेनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आल्या आहे. पिकांची काढणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत , फळबागांची विशेष काळजी घ्यावी, वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करावा

