Advertisement

एसटी महामंडळात चालक-वाहकांची भरती

प्रजापत्र | Tuesday, 17/03/2026
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) तब्बल १७ हजार ७४२ चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ही भरती एसटी महामंडळात लवकरच दाखल होणाऱ्या ८ हजार ३०० नव्या बसेससाठी करण्यात येणार आहे.

     महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत बोलताना सरनाईक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, नव्या बसेसची खरेदी केल्यानंतर त्या चालवण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

नियमित भरती कधी होणार?
सरकारकडून नियमित भरतीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्या भरतीस मंजुरी मिळेपर्यंत ही कंत्राटी भरती केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. मागील वर्षीही कंत्राटी मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती, मात्र ती काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे यंदा घोषित केलेली भरती प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement