Advertisement

 पंचायत समिती निवडणुकीत राडा!

प्रजापत्र | Tuesday, 10/03/2026
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमादरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ठाकरेसेनेचे सदस्य पळवल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची भररस्त्यात कॉलर पकडली. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दानवे कार्यकर्त्यांसह हातात काठी घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर बसल्याचे पाहायला मिळाले.

  'सत्ता आणि पैशाचा गैरवापर'
"आमचे सदस्य कुठे आहेत?" असा जाब विचारत अंबादास दानवे यांनी भाजपचे सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली. ठाकरेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते यावेळी समोरासमोर आले आणि एकच गोंधळ उडाला.  दरम्यान दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले की, "आमच्या तीन सदस्यांना भाजपने सत्तेची ताकद आणि पैशाचा वापर करून पळवले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून आम्ही हे सहन करणार नाही." या प्रकरणावर आपण लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Advertisement

Advertisement