बीड-गेवराई पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करत तब्बल ५० पेक्षा अधिक मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. चोरट्यानी मोटारसायकलची चोरी केल्यानंतर त्या नेकनूरमध्ये आणून लावण्यात आल्या होत्या. त्यानुसार गेवराई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर दोन टेम्पो भरून या दुचाकी गेवराईकडे घेऊन जाण्यात येतं असल्याची माहिती गेवराईचे प्रभारी किशोर पवार यांनी दिली.
गेवराई पोलिसांनी आतापर्यंत दुचाकीची सर्वात मोठी ही कारवाई केली असून याचे सर्वस्तरून कौतुक सुरु आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढलेल्या घटना पाहता पहाटेच्या सुमारास तब्बल ५० पेक्षा जास्त चोरीच्या गाड्या नेकनूरमध्ये आढळून आल्याने पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होतं आहे. आरोपी कोण आहेत? ते चोऱ्या कशा पद्धतीने करायचे? एकूण गाड्या नेमक्या किती याचा तपास सुरु असून थोडयावेळात सर्व माहिती समोर येईल असे ही पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी प्रजापत्रला बोलताना म्हटले आहे.

बातमी शेअर करा
