Advertisement

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाचे डोके फोडले

प्रजापत्र | Monday, 23/02/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी): दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून एकाला लाकडी काठ्याने मारहाण करत डोके फोडल्याची घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खामगाव चौक येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण - पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादी गिता शिवाजी माळी (रा.सौंदाना) यांच्या पतीला व भाच्याला आरोपी प्रल्हाद केशव भावले व आप्पासाहेब कोंडीबा बुधनर (दोघे रा. खामगाव) यांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरत खामगाव चौकात लाकडी काठीने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी गिता माळी यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रल्हाद भावले, आप्पासाहेब बुधनर यांच्या विरोधात कलम ११८ (१), ११५(२), ३५,२,३ (५) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.ह. जाधव करीत आहेत.

Advertisement

Advertisement