Advertisement

 बीड शहरातील मटका अड्ड्यावर कारवाई

प्रजापत्र | Saturday, 14/02/2026
बातमी शेअर करा

 बीड, (प्रतिनिधी):- शहरातील आंबेडकर चौक परिसरातील बाजार तळ येथे सुरू असलेल्या मटका-जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवार (दि.१३) रोजी रात्री कारवाई करत तिघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण ७५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  
     उपअधीक्षक पूजा पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने सापळा रचून दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. बाजार तळ परिसरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मटका जुगार खेळताना इरफान सबीर बागवान रा.भोई गल्ली, रविवार पेठ, बीड व मुस्तकीम कुरेशी रा. रविवार पेठ, भोई गल्ली, बीड हे दोघे आढळून आले. त्यानंतर मंडई बाजार तळाजवळील सिमेंटच्या चबुतऱ्यावर अयान चांद शेख रा. गजानन नगर, बीड हा मटका जुगार खेळताना मिळून आला. पोलिसांनी तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून रोकड रक्कम व जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ७५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर सोन्ने, पोलीस अंमलदार सचिन आगलावे, सुधीर हजारे यांनी केली.

Advertisement

Advertisement