Advertisement

गेवराई बायपास रोडवर इथेनॉल टँकरचा भीषण अपघात

प्रजापत्र | Saturday, 24/01/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.२४(प्रतिनिधी): सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या इथेनॉल टँकरचा गेवराई बायपास रोडवर भीषण अपघात होऊन टँकरला मोठी आग लागल्याची घटना शुक्रवार (दि.२३) जानेवारी रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. अपघातानंतर काही क्षणातच टँकरने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
       अपघाताची माहिती मिळताच गेवराई येथील अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.आगीचे स्वरूप अतिशय भीषण असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.इथेनॉलसारख्या ज्वलनशील पदार्थाचा टँकर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेनंतर काही काळ गेवराई बायपास रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement