Advertisement

छगन भुजबळांना मोठा दिलासा

प्रजापत्र | Friday, 23/01/2026
बातमी शेअर करा

मुंबई: मंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, या आधी एसीबीकडून भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता ईडीनेही त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

   छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोखरक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप ईडीने केला होता.ईडीने छगन भुजबळ, पंकज, समीर व अन्य ५१ जणांवर २०१६ मध्ये  गुन्हा दाखल केला होता. २०२२ मध्ये समीर व पंकज यांनी खटला रद्द करण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या मागदर्शकतत्त्वंनुसार, मूळ गुन्हा रद्द केल्यानंतर ईडीने पीएमएलएअंतर्गत नोंदविलेला गुन्हा कायम राहू शकत नाही. त्याअनुषंगाने आमच्यावरील खटला रद्द करण्यात यावा, असे पंकज व समीर यांनी अर्जात म्हटले होते. दरम्यान, आता या प्रकरणात ईडीने भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Advertisement

Advertisement