Advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार!

प्रजापत्र | Tuesday, 20/01/2026
बातमी शेअर करा

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मोबाइल आणि मुलीच्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँगवॉर उफाळून आला.सराईत गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. आरोपींनी घरावर दगडफेक केली, तसेच मध्ये पडणाऱ्या नागरिकांनाही जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत शुभम जाटसह सात आरोपींना अटक केली आहे.  

 

जमाव बघताच फरार

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास घराच्या दारावर मोठा दगड आढळल्याचा आवाज आला. अनेक लोक बाहेर शिवीगाळ करत होते. बाहेर घेण्यासाठी चिथावत होते . आरोपी शुभम जाट सह इतरांच्या हातात गावठी कट्टा आणि तलवारी चाकू अशी हत्यार होती. दार न उघडल्याने बाहेर जमलेल्या गॅंगने दगडफेक करायला सुरुवात केली. आरोपी शुभम जाटने भीतीपोटी गच्चीवर जाणाऱ्याच्या दिशेने गोळी झाडली.  

 

गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. थोडक्याने मध्ये पडणाऱ्या सगळ्यांना ठार मारण्याचा धमक्या दिल्या. जमाव वाढतोय हे लक्षात येताच आरोपींनी पलायन केलं. मोबाईल चोरीच्या एका वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. 

 

 

पाण्याच्या टाकीत बसला लपून

घटनेनंतर पुंडलिकनगरचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, संदीप बीडकर, अजय कांबळे, मुकुंदवाडीचे उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, नरसिंग पवार आदिनी बीड बायपासवरील म्हस्के पेट्रोल पंपामागे शुभमचे घर गाठले. तेथे हल्लेखोर असल्याने पथकाने घराला घेराव घातला, काही हल्लेखोरांनी गच्चीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर उर्फ अतुल पवार यांना पकडले. मात्र, शुभम सापडला नाही. तो रेल्वेरुळाच्या दिशेने पळून गेल्याचे त्याच्या आईने सांगितले. मात्र, ती खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने निरीक्षक भंडारे, अर्जुन राऊत यांनी गच्चीवरील पाण्याच्या टाक्या तपासण्यास सुरुवात केली. त्यात एका टाकीत शुभम सापडला.

Advertisement

Advertisement