जालना : अंबड, घनसावंगी तालुक्यातील २४ कोटी ९० लाख रुपये अनुदान घोटाळ्यातील तीन संशयित तलाठ्यांसह पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी जेरबंद केले. या प्रकरणात आजपर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
काही आरोपींनी प्रथम जिल्हा व सत्र न्यायालय अंबड येथे अटकपूर्व जामीनसाठी अर्ज सादर केले होते. ते अर्ज फेटाळून लावल्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केले होते. तेथेही अर्ज फेटाळलेले आहेत. ही कामगिरी प्रभारी उपाधीक्षक सिद्धार्थ माने, पोनि. मिथुन घुगे, अंमलदार गोकूळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, पाठक मेजर, जया निकम, निमा घनघात मंदा नाटकर यांनी केली
यांना केली अटक
आर्थिक गुन्हे शाखेने मंडळाधिकारी सुनील रामकृष्ण सोरमारे (३७), तलाठी बप्पासाहेब रखमाजी भुसारे (५३), तलाठी रामेश्वर नाना जाधव (४८), नेटवर्क इंजिनिअर वैभव विश्वंभर आडगावकर (३६), ऑपरेटर विजय निवृत्ती भांडवले (३४) यांना अटक केली.

