Advertisement

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यु

प्रजापत्र | Tuesday, 20/01/2026
बातमी शेअर करा

मुंबई : २०१५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली होती. त्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याचा मंगळवारी (२० जून ) मृत्यु झाला आहे. सांगली जिल्ह्यात समीर गायकवाडचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले. ४३ वर्षीय गायकवाड २०१७ पासून या प्रकरणात जामिनावर बाहेर होता.

 

 गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील १२ आरोपी
गोविंद हत्या प्रकरणाचा सुरू असताना १२ आरोपींची नावे समोर आली होती. त्यातील १० जणांना विशेष तपास पथकाने अटक केली होती. समीर गायकवाडसह वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भरत कुर्न, अमित डेगवेकर, शरद कळसकर, सचिन अंदुरे, अमित बड्डी आणि गणेश मिस्किन या आरोपींना एसआयटीने अटक केली होती. तर आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर उर्फ कुलकर्णी अद्याप फरार आहेत. हे सर्व आरोपी सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. आता या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

Advertisement