पाटोदा दि.२० (प्रतिनिधी):तालुक्यातील वडझरी येथील एक घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ३,२५,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवार (दि.१९) रोजी रात्री घडली असून चोरट्यांविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील शहादेव बापूराव सानप (वय ६०) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याच्या २० ग्रॅमच्या २ अंगठ्या अंदाजे किंमत-१,२५,००० रुपये व शेतीमालातून आलेली रक्कम २,००,००० रुपये असा एकूण ३,२५,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवार (दि.१९) रोजी रात्री ०२ ते पहाटे ४ च्या सुमारास घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहादेव सानप यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात सोमवार (दि.१९) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

