Advertisement

डीजीपींच्या ऑफिसातील अश्लील कृत्याची क्लिप व्हायरल

प्रजापत्र | Tuesday, 20/01/2026
बातमी शेअर करा

कर्नाटक : कर्नाटकमध्ये पोलीस महासंचालकाला निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. रामचंद्र राव यांची कर्नाटक राज्यात पोलीस महासंचालक (नागरिक हक्क अंमलबजावणी) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निलंबनानंतर विरोधकांनीही राज्यातील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे.

     व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत अश्लील कृत्ये करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोमवारी या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. हे व्हिडिओ समोर येताच कर्नाटक प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement