Advertisement

माजगावमध्ये आ.प्रकाश सोळंके यांना धक्का; तुतारीचा विजय

प्रजापत्र | Sunday, 21/12/2025
बातमी शेअर करा

माजलगाव - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आमदार प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघातील माजलगाव नगरपरिषद निवडणूक ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अस्मितेची मानली जात होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या तुतारीने विजय मिळवत आमदार सोळंके यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

 या निवडणुकीत भाजपकडून संध्या मेंढके तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून शिफा बिलाल चाऊस रिंगणात होते. तर आ. प्रकाश सोळंके यांच्याकडून अत्तार मेहरूनबी खलील पटेल मैदानात होत्या.  निवडणूक प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमुळे संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे माजलगाव नगरपरिषद निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. आपल्या मतदारसंघातील सत्ता कायम राखण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वतः लक्ष घालत प्रचाराला जोर दिला होता. मात्र मतदारांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या पारड्यात कौल दिल्याने माजलगाव नगरपरिषदेत सत्ताबदल झाला आहे.

Advertisement

Advertisement