Advertisement

चाऊस कुटुंबाची 'सर्वसमावेशक ' असलेली ओळख तुतारीसाठी फायद्याची तर विरोधकांची अडचण    

प्रजापत्र | Tuesday, 25/11/2025
बातमी शेअर करा

 माजलगाव दि. २४ (प्रतिनिधी ) ; माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला आता धार्मिक रंग देण्याचा प्रकार सुरु होत असल्याचे चित्र असतानाच माजलगाव शहरात चाऊस कुटुंबाची ओळख अगदी सुरुवातीपासूनच सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन चालणारे अशी आहे. चाऊस यांची हीच ओळख आज शहरात 'तुतारी'साठी फायद्याची ठरत असतानाच या प्रतिमेमुळे विरोधकांची मात्र कोंडी होताना दिसत आहे.
   माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी वाटणारे चित्र आता हळूहळू बदलत असून येथील लढत राष्ट्रवादी(शप ) विरुद्ध भाजप अशी होताना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी आ. प्रकाश सोळंकेंच्या भूमिकेनेच वाढत आहेत. आ. ,प्रकाश सोळंकेंच्या गटाकडून सातत्याने कॅव्हस यांच्या कुटुंबावर अगदी पातळी सोडून देखील टीका होताना दिसत असून त्याचा परिणाम चाऊस यांच्या सहानुभूतीमध्ये वाढ होत आहे.माजलगाव शहरात स्वतः सहाल चाऊस यांचा मोठा संपर्क असो, कोणत्याही गल्लीत किंवा मोहल्ल्यात त्यांना सहज जाता येते अशी त्यांची प्रतिमा आहे. आतापर्यंतच्या राजकारणात सर्वांना सोबत घेऊन जाणारा, कोणत्याही प्रकारच्या भेदभावाच्या राजकारणापासून दूर असलेला चेहरा हीच त्यांची ओळख राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला कोणत्यातरी एका चौकटीत बांधताना विरोधकांच्या देखील नाकी नऊ येत असल्याचे चित्र आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी चाऊस यांच्यावर अमुक एक समाजाचा शिक्का मारता येत नाही ही विरोधकांची देखील अडचण असून शहरासाठी काम करणारा सर्वसमावेशक चेहरा म्हणून चाऊस कुटुंबाची असलेली प्रतिमाच निवडणुकीत त्यांचे पारडे जड करणारी ठरत आहे.

Advertisement

Advertisement