नाशिक : बनावट शालार्थ आयडी प्रकरणांमध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. मनोज रामचंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी अविनाश पाटील, नीलेश निंबा पाटील अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून यात दोघे संस्थाचालक आहेत.
उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार बनावट शालार्थ आयडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर २०२३ ते मार्च २०२५ च्या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्था सहशाळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांनी संगनमत करून शालार्थ प्रणालीत बनावट आयडी वापरून शासनाची जवळपास दहा कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोप संशयितांवर ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनाही पंधरा दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयातून निलंबित करण्यात आहेत. सदर घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत.

