मुंबई : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे, त्याचबरोबर करण जोहरने पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती दिली आहे. देओल कुटुंबीय धर्मेंद्र यांचे पार्थिव घेऊन स्मशानभूमीत पोहोचले आहेत. इंडस्ट्रीतील अनेकजण त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत.
बातमी शेअर करा

