Advertisement

लाच मागितल्या प्रकरणी अभियंत्यावर कारवाई 

प्रजापत्र | Saturday, 22/11/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२२ (प्रतिनिधी): गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंत्याने एका शेतकर्‍यांकडे गायगोठ्याची फाईल करण्यासाठी १००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. आज त्या अभियंत्याच्या मुसक्या बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आवळल्या आहेत. विनायक राठोड असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.     
         विनायक राठोड ह्याने बुधवार (दि.१९) नोव्हेंबर रोजी १००० रुपयांच्या लाचेची मागणी त्याच्या बीड शहरातील अंबिका चौकातील एका प्रायव्हेट कार्यालयात केली होती. संबंधीत तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीने त्याच्याविरोधात सापळा लावला. परंतु राठोडला संशय आल्यानंतर त्यानं तक्रारदाराला टाळायला सुरूवात केली. मात्र लाचेची मागणी केल्यावरून विनायक राठोड यास बीड एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बीडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास केली.

Advertisement

Advertisement