मुंबई: लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
सोबतच घेतलेले पैसे वसूल केले जाणार आहे, मात्र वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींची (Ladki Bahin Yojana) केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाणार आहे. अडीच कोटी महिलांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची आतापर्यंत ई केवायसी पूर्ण झाली आहे.(Ladki Bahin Yojana)

