नितीश कुमार यांनी आज (दि. २०) दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यानंतर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप आणि एनडीएच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी २४ अन्य मंत्र्यांना शपथ दिली.
बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआने २४३ पैकी २०७ जागांवर विजय मिळवला. नितीश कुमार यांनी बुधवारी (दि. १९) बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेतली. आपला राजीनामा सादर करून नवीन सरकार स्थापनेचा दावा केला. रालोआने बिहारमध्ये दुसर्यांना २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. यापूर्वी २०१० मध्ये त्यांनी २०६ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले.

