Advertisement

कुंडलिक खांडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश 

प्रजापत्र | Tuesday, 11/11/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.११ (प्रतिनिधी) कुंडलिक कुंडलिक खांडे यांनी मंगळवार (दि.११) रोजी मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

   बीडच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपू्र्वी शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. शिंदे सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या कुंडलिक खांडे यांनी आज मंगळवार (दि.११) रोजी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतलं. त्यांच्यासोबत अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. 

Advertisement

Advertisement