अशोक शिंदे
नेकनूर-येथून जवळ असलेल्या रत्नागिरी गावामधील एका शाळेच्या आवारात काल (दि.०३) सकाळी अकरा वाजता सहा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला होता. अंबाजोगाई येथील रुग्णालयात त्याच्या उत्तरिय तपासणीत गळ्याला दाब पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.नेकनूर पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
धनराज मोतीराम सपकाळ (वय 6) हा बुधवारी आपल्या बहिणीसोबत शाळेत गेला. सकाळी 11 वाजता त्याचा मृतदेह शाळेच्या परिसरात आढळून आल्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. धनराज सपकाळचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला होता. रात्री उशिरा अहवाल असून यात त्या बालकाचा गळा आवळाल्याने मृत्यु झाला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान सपोनि लक्ष्मण केंद्रे हे याप्रकारणाचा पुढील तपास करीत आहेत.