बीड: अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आता अनुसूचित महिला राखीव गटांवर लक्ष असणार आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेतील केसापुरी, तालखेड, तेलगाव, होळ, पिंप्री, मोहा, जिरेवाडी, पाटोदा म. हे गट अनुसूचित जातींसाठी अधिसूचित करण्यात आले होते. आता त्यापैकी जिरेवाडी, होळ, तेलगाव, पाटोदा म हे गट अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या चार गटाकडे अध्यक्षपदाची लढत म्हणून सर्वांचे लक्ष असेल. अर्थात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या इतर गटामधून देखील महिला उमेदवार निवडणूक लढवून अध्यक्षपदावर दावा करु शकेल.
बातमी शेअर करा